Advertisement

E pik pahani-आता राज्य सरकार प्रमाणे केंद्र सरकारचे देखील येणारे ई पीक पाहणी ॲप

 

Epik pahani

आता राज्य सरकार प्रमाणे केंद्र सरकारचे येणार ई पीक पाहणी ॲप


       महाराष्ट्र सरकारकडून गेल्या दोन वर्षापासून राज्यामध्ये ईपीक पाहणी उपक्रम राबविण्यात येत असून मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही पीक पाहणी करण्यात येत आहे.

        याच धर्तीवर आता  ई पीक पाहणी प्रणाली देशातील 15 राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असून केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेत येत्या खरीप हंगामामध्ये ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. Epik-pahani

          मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक पेऱ्याची नोंद करता यावी याकरिता राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने ही प्रणाली सुरू केली असून हे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केल्यावर शेतकऱ्याला शेतीची काही आवश्यक माहिती भरल्यानंतर पिकांची नोंदणी करता येते.

यामुळे राज्याच्या कोणत्या भागात कोणते पीक आहे व कोणत्या पिकाखालील किती क्षेत्र आहे. तसेच कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात आणि गावात कोणते प्रमुख पीक आहे याची माहिती मिळणे अगदी सोपे झाले.

          या पद्धतीने करण्यात आलेल्या पीक पाहणीचा उपयोग थेट धान्य खरेदीत देखील करण्यात येत आहे. तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना देखील  पिक पाहणीची आकडेवारी गृहीत धरली जात असून बँकांना देखील कर्ज देताना याचा उपयोग होत आहे.एवढेच नाही तर ई पीक पाहणी प्रणालीमुळे पिकांची डिजिटल स्वरूपामध्ये माहिती सहज मिळणे शक्य झाले आहे.

Epik-pahani

     वाचा :

Post a Comment

0 Comments