Advertisement

सलोखा योजना - शेतजमीन अदलाबदली साठी आता द्यावे लागणार फक्त एक हजार रुपये Salokha Yojana 2023 farmer scheme panchnama

Salokha Yojana 2023 farmer scheme panchnama : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर : राज्यशासनाने सलोखा योजना सुरु केली आहे . यानुसार आता शेतजमिनीची अदलाबदल केवळ एक हजार रुपयांमध्ये होणार आहे . 

Salokha Yojana 2023
Salokha Yojana 2023


शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना आणली आहे. 

Salokha Yojana 2023

महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे बाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरुन होणारे वाद, शेती वहीवाटीचे वाद, भावा- ‘भावांतील वाटणीचे वाद, शासकिय योजेनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमीनीचे वाद समाजामध्ये आहेत. हे वाद दूर करण्यासाठी शासनाने सलोखा योजना आणली आहे . सध्या हि योजना पुढील दोन वर्षासाठी लागू राहील . 'Salokha Yojana 2023'


योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती :

१. पिहल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा पिहल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षे असला पाहिजे. 

२. शेतकऱ्याची शेतजमीन एकाच गावात असणे आवश्यक आहे . 

३. वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकरी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवही मध्ये करणे आवश्यक . Salokha Yojana 2023 farmer scheme panchnama 

४. वैयक्तिक जमिनींचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही . 

५. सलोखा यॊजना अमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर परतावा मिळणार नाही . 


सलोखा योजनेमुळे होणारे फायदे : 

१. शेतजमिनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेकऱ्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन, वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा फायदा होऊ शकतो. सलोखा योजना राबविली तर अशा परस्परविरोधी ताब्याबाबत असलेली विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघतील."Salokha Yojana 2023"
२. शेतकऱ्यांचे आपापसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात. Salokha Yojana 2023 farmer scheme panchnama वाद मिटल्यास शेतजमिनीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाया जमीनधारकांच्या जमीन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याच्या त्याच्या नावे होतील.

Post a Comment

0 Comments