RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये झाला मोठा बदल, आता “ही” कागदपत्रे नसतील तर नाही करता येणार अर्ज, पहा सर्व कागदपत्रांची यादी.
Rte Admission New Documents List नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे सरकारी न्यूज या आपल्या मराठी न्यूज पोर्टलवर मित्रांनो आरटीई अर्थातच राईट टू एज्युकेशन अंतर्गत आपल्या बालकांना इंग्लिश स्कूलमध्ये मोफत प्रवेश करण्यासाठी शासनांतर्गत ही सुरू झालेली एक कायदा आणि एक योजना सुद्धा आपल्याला म्हणता येईल. तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये मोफत प्रवेश सुद्धा मिळत आहे आणि शासनाची ही एक मोठा निर्णय ठरलेला आहे. मित्रांनो शिक्षण हा सामाजिक तसेच आधुनिक समाजाचा एक मोठा पाया असा मानला जातो तसेच प्रत्येक मुलाला शिक्षण हे दिलेच पाहिजे. आणि मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क किंवा शिक्षणाचा अधिकार हा भारतीय संसदेचा एक कायदा सुद्धा आहे आणि याची सध्या गरज सुद्धा आपल्या गोरगरीब समाजाच्या मुला आणि मुलींना आहे. तर मित्रांनो राईट टू एज्युकेशन या कायद्यांतर्गत सहा ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी इंग्लिश स्कूलमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि मित्रांनो हा कायदा राईट टू एज्युकेशन 26 ऑगस्ट 2009 या दिवशी मंजूर झालेला आहे तसेच शिक्षणाला प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क तयार करण्यासाठी भारत 135 देशांपैकी एक देश आता बनलेला आहे. तर मित्रांनो राईट टू एज्युकेशन प्रक्रिया अंतर्गत तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर आता यामध्ये काही डॉक्युमेंट्स ची लिस्ट आणि देत आहोत आणि त्याची लिंक आणि खाली देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत हे दिसणार आहे. Right To Education Act 2009
Documents Required For RTE Online Form 2023 मित्रांनो आरटीई कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांसाठी एलकेजी प्रवेशाचे कमीत कमी वयाचे जन्म प्रमाणपत्राद्वारे निश्चित केले जात असते. तसेच मित्रांनो आरटीई या कायद्याप्रमाणे सर्वच खाजगी शाळांना आर्थिक दुर्बल घटकांमधून असलेल्या 25 टक्के जागा ज्या आहेत त्या गोरगरीब नागरिकांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश शासनातर्फे आलेले आहेत. तसेच तुम्हाला सुद्धा आरटीई मध्ये अर्ज करायचा असेल अर्थातच तुमच्या बालकाला इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश करण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या कुटुंबाची वार्षिक कमाई ही साडेतीन लाख रुपये पेक्षा कमी असावी तसेच आरटीई कायद्याअंतर्गत या जागांसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात. आणि विशेष अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो अनाथ आणि विशेष गरजा लागणारी मुले स्थलांतरित कामगारांची मुले सुद्धा आरटीई कायदे अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. मित्रांनो ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आम्ही खाली देतच आहोत त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही शासकीय पोर्टलवर लॉगिन करणार आहात आणि तुमचा सर्व व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्याची एक सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे ठेवणे गरजेचे आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
0 Comments