![]() |
| Juni Pension Update |
जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
Old Pension Yojana : राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मागणीसाठी बेमुदत संपाची हाक दिली होती. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने सरकारी यंत्रणा कोलमडून पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
Juni Pension Update
यासगळ्या अटीतटीच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात मोठी माहिती दिली आहे. येत्या काळात जुन्या पेन्शन धारकांच्या प्रश्नांवर विचार केला जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले. जुन्या पेन्शनबाबत तीन महिन्यात समिती अहवाल देणार असून आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. आम्ही सकारात्मक आहोत, याबरोबरच आम्ही निर्णय घेण्याची तयारी केली आहे. फक्त कर्मचाऱ्यांनी संयम ठेवावा. त्यांची भूमिका आम्हाला समजावून घ्यायची आहे. हा जो प्रश्न आहे तो चर्चेनं सुटेल हे लक्षात घ्यावे. असेही आवाहन त्यांनी केले आहे Old Pension Yojana update
मुख्यमंत्री म्हणाले, आमची भूमिका ही मदतीची राहणार आहे. आमची पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यात आम्ही कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले आहे. आमची भूमिका सकारात्मक आहे. आपण जे काही निर्णय घेणार आहोत त्याचे आर्थिक परिणाम यासगळ्याचा सारासार विचार होण्याची आवश्यकता आहे. तेव्हा सगळ्या बाजूनं विचार होईल. त्यामुळेच आपण एक समिती तयार करण्याचा विचार केला आहे.
सरकारनं चर्चा करुन निर्णय घेण्याचा विचार केला आहे. त्यातून मार्ग निघेल असा आमचा विश्वास आहे. या निर्णयातून जे सुत्र ठरेल ते उपयोगी ठरेल. तातडीनं कुठलाही कर्मचारी निवृत्त होत नाही. निर्णय येईपर्यत जे निवृत्त होतील त्यांना देखील आगामी काळात नव्या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यांना योग्य ते लाभ घेता येतील. आम्ही सकारात्मक आहोत. असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.Juni Pension Update
हे पण वाचा
सोलार पंप चे अर्ज त्वरित मंजूर करून घेण्यासाठी हे पण वाचा
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतही कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे. कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय झाला आहे. त्याशिवाय. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे. सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे. 2005 पासून ते आजपर्यंत म्हणजेच मागील 17 वर्षात 2500 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मात्र. त्यांच्या कुटुंबियांनाहे कुटुंब निवृत्ती वेतन मिळत नव्हते. आता कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास मृत्यू उपदान मिळणार आहे. या आधी 10 लाखांचा सानुग्रह अनुदान मिळत होत. त्यात आता बदल करण्यात आला आहे. तर, निवृत्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा उपदान ही मिळणार आहे. नवीन पेन्शनधारकांना या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे . Juni Pension Update.


0 Comments